मिरज : शहर प्रतिनिधी
तालुक्यातील शिपूर- बेळंकी रस्त्यावर वाळूने भरलेले दोन ट्रक पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.शिपूर-बेळंकी रस्त्यावर पहाटे दोन वाजण्यास सुमारास वाळूने भरलेले दोन ट्रक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ते दोन ट्रक ताब्यात घेतले. त्या ट्रकमध्ये 80 हजार रुपये किंमतीची आठ ब्रास वाळू होती. वाळूसह ट्रक जप्त करण्यात आले. या प्रकरणी भारणगोंडा बी. पाटील (रा. अथणी), विशाल दादासो घोडे (रा. सलगरे) यांना अटक करण्यात आली.