Sun, Jan 20, 2019 14:19होमपेज › Sangli › प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, हजेरी हजार रुपये

प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, हजेरी हजार रुपये

Published On: Jul 03 2018 1:27PM | Last Updated: Jul 03 2018 1:27PMसांगली : प्रतिनिधी

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झाली आहे. या प्रचारासाठी गर्दी गोळा करण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. यासाठी आता सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचारासाठी नामी शक्‍कल लढविण्यात आली आहे. निवडणुकांच्या प्रचारात प्रामुख्याने तरुण वर्गाला मागणी असते. 

उमेदवाराचे माहितीपत्रक, स्लिप , प्रचार साहित्य घरोघरी पोहचवण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच गर्दीसाठी काही उमेदवारांना भाडोत्री कार्यकर्तेही घ्यावे लागतात. या निवडणूकीत हाच धागा पकडून अशी मुले भाड्याने पुरवण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. सांगलीत हरिपूर रोडवर एक मंडळाने चक्क फलक लावून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या फलकाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.