तासगाव : प्रतिनिधी
जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने प्राणांची आहूती दिल्यानंतर मराठा समाजाच्या संयमाचा बांध फूटू लागला आहे. हे बलीदान व्यर्थ जाऊ नये यासाठी समाजाचे तरुण रस्त्यावर उतरु लागले आहेत. जरंडी (ता. तासगाव) येथील तरुणांनी बुधवारी सकाळी टायर पेटवून राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
आज सकाळी जरंडी गावातील मराठा समाजातील तरुणांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. शासनाचा निषेध करत रस्त्यावर टायर पेटवले. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार ठोस तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच जाईल असा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला.