Tue, Jul 16, 2019 12:29होमपेज › Sangli › सांगलीत वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऑर्केस्ट्रा मालकावर गुन्हा 

सांगलीत वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऑर्केस्ट्रा मालकावर गुन्हा 

Published On: Dec 08 2017 6:51PM | Last Updated: Dec 08 2017 6:51PM

बुकमार्क करा

कुपवाड : वार्ताहर

शहरात सुरु असलेल्या यल्लमा देवीच्या यात्रेत वेळेच्या नियमांचे तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यता आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ऑर्केस्ट्रा सुरु ठेवल्याप्रकरणी ऑर्केस्ट्रा मालक अनिल हिलगे (वय-५२,रा. कोल्हापूर ) यांच्या विरोधात कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुपवाड शहरात गेल्या चार दिवसांपासून यल्लमा देवीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत गुरुवारी रात्री सोसायटी समोरील मोकळया जागेत अनिल हिलगे यांचा वैभव ऑर्केस्ट्रा सुरु होता.न्यायालयाच्या आदेशाचे संबंधित मालकाने उल्लंघन केल्याची तक्रार वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे अज्ञातानी केली. त्यानुसार वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशानुसार कुपवाड पोलिसांनी चौकशी केली.

कोल्हापुरच्या अनिल हिलगे यांनी वैभव ऑर्केस्ट्राच्या नावाखाली स्वतःच्या फायद्यासाठी प्रेक्षकांकडून पैसे घेऊन विनापरवाना व बेकायदा तसेच आजुबाजुच्या लोकांना आवाजाचा त्रास होईल, अशा उच्च पातळीवर आवाज ठेवल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे शासनाने पारित केलेल्या आवाज व वेळेच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम सुरु ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा संबंधित ऑर्केस्ट्रा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. हवालदार संतोष फड़तरे तपास करीत आहेत.