Tue, May 26, 2020 22:33होमपेज › Sangli › ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात

ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात

Published On: Sep 11 2019 2:31AM | Last Updated: Sep 11 2019 12:10AM
कडेगाव : शहर प्रतिनिधी

‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा, हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे- एकीसे सागर पार करेंगे’ अशी ऐक्याची हाक देत येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार     सोहळा मंगळवारी संपन्‍न झाला. हा  भेटीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. 

सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावांतील मानकर्‍यांना वाजत-गाजत आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा करून मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. तेथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत वीजबोर्डजवळ थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले.

हे सर्व ताबूत पाटील चौकात  आणण्यात आले. त्यानंतर बागवान,   आत्तार, शेटे, माईनकर आणि अन्य लहान-मोठे ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर ते सर्व  पाटील चौकात नेण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा ताबूत उचलण्यात आला.त्यानंतर ताबूतांचा प्राथमिक भेटींचा सोहळा पाटील वाडा (चौकात)  झाला.  हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत- गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौकाकडे (मोहरम मैदान) गेले. 

यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या.वाटेत तांबोळी ,शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर  मानकर्‍यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे  मोहरम मैदानात  एकत्र झाले.तिथे कर्बल , बुधवार पेठ व शुक्रवार पेठ  मेलवाल्याकडून राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकर्‍यांमार्फत  मसूद माता ताबूत पंजे , बारा इमाम पंजे मानकर्‍यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. यामध्ये मानाचा सात भाई- पाटील-इनामदार -सुतार-अत्तार-बागवान-माईनकर- तांबोळी-देशपांडे-मसूदमाता -बारा इमाम पंजे- मसूदमाता पंजे वगैरे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी उत्साहात पार पडल्या. त्यानंतर सर्व ताबूत  मार्गस्थ झाले. 

आमदार विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम,आमदार पृथ्वीराज देशमुख,जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख,जयंत पाटील (कराड), भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड,भीमराव मोहिते,जितेश कदम,नगराध्यक्षा नीता देसाई,उपनगराध्यक्ष राजू जाधव,चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील,दीपक भोसले,धनंजय देशमुख,विजय शिंदे,रविंद्र देशपांडे,नगरसेवक नितीन शिंदेे,तहसीलदार अर्चना शेटे,नायब तहसीलदार राजेंद्र यादव  यांच्यासह  भाविक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.