Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Sangli › सांगलीत महानगरपालिका निवडणुकासाठी 'आजपासून' आचारसंहिता लागू

सांगलीत महानगरपालिका निवडणुकासाठी 'आजपासून' आचारसंहिता लागू

Published On: Jun 25 2018 6:24PM | Last Updated: Jun 25 2018 6:24PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका  तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ ऑगस्ट २०१८ रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्‍याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी  केली आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

     सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत १३ ऑगस्ट २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ असून मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.

जळगाव महानगरपालिका

      जळगाव महानगरपालिकेची मुदत १९ सप्टेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ६० हजार २२८ असून मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार १५ इतकी आहे. एकूण १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३८ जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४ , तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिका

      वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ९७ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी ४ जुलै २०१८ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल.  

कसा असणार आहे, वरील महानगरपलिका निवडणून कार्यक्रम 

नामनिर्देशनपत्रे दाखल करणयाची मुदत ४ ते ११ जुलै २०१८ पर्यंत आहे.  नामनिर्देशनपत्रांची छाननी  करण्‍याची मुदत १२ जुलै २०१८ पर्यंत आहे.  उमेदवारी मागे घेण्‍याची मुदत  १७ जुलै २०१८ पर्यंत आहे.  निवडणूक चिन्ह वाटप करण्‍याची मुदत  १८ जुलै २०१८ पर्यंतत तर  १ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.         मतमोजणी  ३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल.  मतमोजणी निकालाची राजपत्रात प्रसिध्दी मुदत ६ ऑगस्ट २०१८ पर्यंत  आहे.   निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल,