Fri, Nov 16, 2018 14:02होमपेज › Sangli › मांजर्डे गोळीबार प्रकरण; विशाल खेडेकरला अटक

मांजर्डे गोळीबार प्रकरण; विशाल खेडेकरला अटक

Published On: Jul 02 2018 6:40PM | Last Updated: Jul 02 2018 6:40PMमांजर्डे(जि. सांगली )  : वार्ताहर

मांजर्डे (ता.तासगाव) येथे शुक्रवारी दि.22 रोजी रात्री लग्नसमारंभाच्या गावदेवावेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत रविवार दि.24 रोजी विशाल खेडेकर (गाव-आरवडे,ता.तासगाव)व अन्य अनोळखी एक यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये विशाल खेडेकरला रविवारी अटक करण्यात पुणे येथील देहू रोड पोलिसांना यश आले आहे तर अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. तासगाव पोलिसांनी यास दुजोरा दिला आहे.

मांजर्डे येथे शुक्रवारी दि.22 जून रोजी रात्री 11 च्या दरम्यान गावदेवाच्या वेळी दोघांनी गोळीबार केला होता. याबाबत तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तासगाव पोलिस पुणे पोलिसांच्या सतत संपर्कात होते. पुणे पोलिस ठाण्यात अन्य दोन गुन्ह्यादाखल आहेत.

विशाल खेडेकर आणि एक अनोळखी  शुक्रवारी रात्री मांजर्डे येथील अशोक मोहिते यांच्या घराजवळ आले व त्यांनी बेंजोचे साहित्य गोळा करतेवेळी  प्रवीण जाधव यांच्या कानपट्टीस पिस्तूल लावले आहे. ते कोण आहेत हे पाहणेसाठी मोहिते व अन्य  गेले असता दोन अनोळखी माणसे दिसली, त्यांना तुम्ही कोण आहात, का थांबला  असे विचारताच त्यांनी शिवीगाळ व लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने अशोक मोहिते यांच्या दिशेने गोळीबार केला ती गोळी मोहिते यांच्या दोन पायांच्या मध्ये जमिनीत घुसली, व अन्य एकाने हवेत गोळीबार केला आणि दोघे लाल रंगाच्या पल्सरवरून आरवडेच्या दिशेने निघून गेले.

त्यानंतर गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता कोणी सापडले नाही. लाल रंगाची पल्सर मात्र, आरवडे येथे टाकून ते पळून गेले. या गाडीची मांजर्डे मधील तरुणांनी तोडफोड केली. याबाबतची तक्रार अशोक मोहिते (गाव-मांजर्डे)यांनी तासगाव पोलिसात दिली होती.