Sun, Jan 20, 2019 17:28होमपेज › Sangli › सांगली :   आरवडेत राधाकृष्णाला दुधाचा अभिषेक (Video)

सांगली :   आरवडेत राधाकृष्णाला दुधाचा अभिषेक (Video)

Published On: Jul 16 2018 5:11PM | Last Updated: Jul 16 2018 5:10PMमांजर्डे : वार्ताहर

मांजर्डे (ता .तासगाव ) परिसरात दूध बंद आंदोलनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.  आरवडेत हरेकृष्ण मंदिरात राधाकृष्णाला दुधाचा अभिषेक घालून तर बस्तवडेत वारकऱ्यांना दूध वाटप करून केला निषेध करण्यात आला. मांजर्डे गावात दूध रस्त्यावर ओतण्यात आले.  पेड, आरवडे,  बस्तवडे, बलगवडे,  खूजगाव, कौलगे, हातनूर या भागात दूध उत्पादकानी कडकडीत पूर्णपणे बंद ठेवले.

आरवडे येथे सकाळी 10 वाजता हरेकृष्ण मंदिरात आसपासच्या गावातील शेतकरी जमा झाले.  त्यांनी सर्वांनी भगवान राधाकृष्ण यांच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्याची सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. 

या सरकारला दूध दरवाढीचे चांगली बुद्धी दे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ दूध उत्पादक शेतकरी व सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.