Thu, Jan 24, 2019 16:02होमपेज › Sangli › अनिकेत कोथळे खून : 'संशयितांनी अद्याप वकील दिला नाही'

अनिकेत कोथळे खून : 'संशयितांनी अद्याप वकील दिला नाही'

Published On: Apr 26 2018 12:37PM | Last Updated: Apr 26 2018 12:37PMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी संशयित असलेल्या सात आरोपीपैकी एकाही संशयितांनी अद्याप वकील दिला नाही. त्यामुळे या खटल्याची सुनावणी लांबणीवर गेली असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

निकम यांनी सीआयडीकडून या खटल्याबाबतची आज सविस्तर माहिती घेतली. याशिवाय अनिकेतच्या दोन्ही भावांशी ही चर्चा केली. यावेळी दोन्ही भावांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली.

आसारामबापू शिक्षा प्रकरण 

मनुष्य एका पदावर गेल्यावर त्याला आपलं कोण काही करू शकणार नाही असं वाटत असत, आणि ते अन्याय अत्याचार आणि गुन्हे करत असतात. संत म्हणवणाऱ्यांनी जर अशी कृत्ये केली तर काय आदर्श राहणार म्हणून अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा होते ती योग्यच आहे. नेता असो वा अभिनेता, न्याय देवता पाहत नाही, आणि खोटी गांधीगिरी करून पाप धुतले जात नाही.