Sun, Jul 05, 2020 05:23होमपेज › Sangli › आंदोलकांनी पोलिसांना फुले देऊन सहकार्य करण्याचे आवाहन

 इस्लामपूर राज्यमहामार्गावर चक्काजाम 

Published On: Aug 09 2018 5:07PM | Last Updated: Aug 09 2018 5:10PM कवठेपिरान : वार्ताहर 

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी सांगली - इस्लामपूर रोडवरती लक्ष्मीफाट्याजवळ गुरुवारी पै. भिमराव माने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अर्धातास चक्काजाम आंदोलन करुन, महामार्ग रोखून धरला. सकल मराठा समाज्याच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी मिरज पश्चिम भागात मोटार सायकल रॅली काढण्यात आली, तसेच या भागात गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. 

आंदोलकांनी चक्काजामच्या सुरुवातीलाच पोलिसांना गुलाबांचे फुले देऊन सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. त्यानंतर दुपारी टोल नाक्यावर वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रस्ता अडवून धरण्यात आला होता. यावेळी मराठा समाज्याबरोबर इतरही समाज्यातील बांधवही पाठिंबा दर्शविण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 

Image may contain: 13 people, including Digambar Koli and Jay Kamble, people smiling, people standing and outdoor

कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचा मोठ्ठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुर्ण शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहून चक्काजामचा समारोप करण्यात आला.