Mon, Apr 22, 2019 21:46होमपेज › Sangli › तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार

तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:17PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची निवडणूक  काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप यांच्यात होईल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेच्या  रुपाने एक सक्षम पर्याय पुढे आला . या तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारेल, असा विश्‍वास खासदार गजानन किर्तीकर आणि उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, शेखर माने आदी उपस्थित होते. 

दरम्यान विविध ठिकाणी जोरदार रॅलीने शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेच्या प्रचाराची सांगता आज झाली. खासदार किर्तीकर म्हणाले, शिवसेनेसाठी निवडणूक नवीन नाही. भाजप-शिवसेना युतीमुळे काही ठिकाणी आमचे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र  सर्वच निवडणूका स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेतला आहे. त्यानुसार मोर्चेबांधणी आणि तयारी आम्ही सुरू केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच मोठ्या

ताकदीने लढवली.  येथे आतापर्यंत आमची फार काही ताकद नव्हती. त्यामुळे आम्हाला नगण्य मानले जात होते. मात्र  पहिल्याच निवडणुकीतील  सभा, प्रचार फेरी यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले, यावेळी मतदार आम्हाला नक्की संधी देतील.  आम्ही जनतेला दिलेला वचननामा जनता नक्की स्विकारेल. सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादीला या निवडणुकीत चांगलाच धडा मिळेल. भाजपचाही स्वप्न भंग होईल.