Sat, Jan 19, 2019 20:52होमपेज › Sangli › भाजप- जुनसुराज्य आघाडीच्या हालचाली

भाजप- जुनसुराज्य आघाडीच्या हालचाली

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:41PMसांगलीः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी भाजप  आणि  जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्यात आघाडी करण्याच्या  हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची यासंदर्भात नुकतीच मिरज येथे  बैठक झाली. 

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची राज्यात, केंद्रात युती आहे. मात्र  निवडणुका स्वबळावर लढवणार अशा घोषणा होत आहेत. त्याच वेळी भाजप- जनसुराज्य आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्याच प्रमाणे सांगली महापालिका निवडणुकीतही आघाडी होण्याची शक्यता आहे. 

दहा वषार्ंपूर्वी  महापालिका निवडणूक  जनसुराज्य पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी तीन नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर गेली विधानसभा निवडणूकही लढवण्यात आली होती. आता  मंत्री कोरे यांच्यामुळे  भाजपला अधिक फायदा होईल. या पक्षाचा राज्य पातळीवर भाजपला फायदा होईल, त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती झाल्यास जनसुराज्यला चांगल्या जागा मिळतील, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. समित कदम म्हणाले, भाजप- जनसुराज्य आघाडीवर शिक्कामोर्तब ही केवळ औपचारिकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकत्र काम करीत आहेत. त्या प्रमाणे येथेही आघाडी होईल, किमान दहा जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे.