Thu, Apr 25, 2019 18:02होमपेज › Sangli › मिरजेत पैसे वाटताना चौघांना पकडले; दोन लाख जप्त 

मिरजेत पैसे वाटताना चौघांना पकडले; दोन लाख जप्त 

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 11:18PMमिरज : शहर प्रतिनिधी 

मध्यरात्री  पैसे वाटताना मिरजेत चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाख सात हजार रुपये जप्त करण्यात आले. प्रभाग क्रमांक वीस व प्रभाग क्रमांक सहामध्ये ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस सुहेल मुल्ला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

भाजप उमेदवाराचे पैसे वाटताना अजगर शरीकमसलत, आमीर शरीकमसलत यांना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठेत पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्या दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई ख्वाजा वस्तीमध्ये करण्यात आली. प्रभाग क्रमांक वीसमधील भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटण्याच्या उद्देशाने साडेसात हजार रुपये बाळगल्याप्रकरणी अजिंक्य केसरखाने, अमित कुरणे या दोघांना पकडले. त्यांच्याकडील साडेसात हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.या दोघांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.