Thu, Jul 18, 2019 04:59होमपेज › Sangli › लवकरच कचर्‍यापासून 50 टन खत निर्मिती

लवकरच कचर्‍यापासून 50 टन खत निर्मिती

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:40PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी
घनकचरा व्यवस्थानाअतंर्गत बेडग रस्ता कचरा डेपो येथे ओला व सुक्या कचर्‍यापासून कंपोस्ट खताची निर्मिती सुरू झाली आहे. सध्या 25 टन खत निर्मिती केली जाते. लवकरच दोन दिवसांत दुसरे सॅग्रिगेटर मशीन बसल्यानंतर दररोज 50 टनापेक्षा जास्त खत निर्मिती होईल, असे आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

दरम्यान, स्वच्छ शहर योजनेत पहिला क्रमांक मिळाल्यास 25 कोटी रुपये बक्षीस आहे, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे, असेही ते म्हणाले. यासाठी वॉर्डवार नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम आणण्यासाठी लोकप्रतिनिधी, लोकसहभाग आणि अधिकारी यांची एकी आवश्यक आहे. यामध्ये शहरांना अनुक्रमे 25, 15 व 10 कोटी रुपये बक्षीस आहे. त्यासंदर्भात पदाधिकारी, नगरसेवकांची बैठकही घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

खेबुडकर म्हणाले, येत्या 28 जानेवारीनंतर केव्हाही केंद्राची स्वच्छता टीम पाहणी करायला आहे. यापूर्वी सर्व त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात महापौर हारुण शिकलगार यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत सर्वेक्षण मोहिमेची बैठक आयोजित केली होती. 

गटनेते किशोर जामदार, उपायुक्त सुनिल पवार, उपायुक्त स्मृती पाटील, उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने, संतोष पाटील, राजेश नाईक, विष्णू माने, मैनुद्दीन बागवान, संगीता खोत, बाळासाहेब गोंधळी, शिवराज बोळाज, अनारकली कुरणे, संगीता हारगे आदी उपस्थित होते.    

यावेळी नाईक, संजय मेंढे, गटनेते जामदार, विष्णू माने यांनीही सूचना केल्या. शेखर माने म्हणाले, आहे त्या यंत्रसामग्रीमधूनच  स्वच्छता मोहिम राबवा. स्वच्छतेच्या नावाखाली घनकरा प्रकल्पासाठी असलेल्या 42 कोटी खर्च करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही उधळपट्टी थांबवा.

खेबुडकर म्हणाले, मिरजेतील कचरा डेपोवर घनकचरा व्यवस्थापनातंर्गत सॅगिगेटर मशीनसंदर्भात आरोप होत आहेत. पण दोन पैकी एक सॅग्रीकेशन मशिन बसवले आहे. ही मशिनरी उच्चस्तरीय तज्ज्ञ कमिटीचे सदस्य डॉ. प्रताप सोनावणे यांच्या सूचनेनुसार बसविली आहे. या मशिनमधून आतापर्यत 25 टनाच्या वर खत निर्मिती झाली आहे. त्याची शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी  केली आहे.

 दुसरे मशिनही याच ठिकाणी बसवले जाणार आहे, यामुळे दररोज किमान 50 टनापेक्षा जास्त खत निर्मिती होईल.