Tue, Apr 23, 2019 13:42होमपेज › Sangli › यशवंत पंचायत राज समितीतर्फे आज तपासणी

यशवंत पंचायत राज समितीतर्फे आज तपासणी

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:17PMसांगली : प्रतिनिधी

यशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत पुणे विभागीयस्तरीय तपासणी दि. 20 व 21 रोजी होणार आहे. जिल्हा परिषद तसेच शिराळा व आटपाडी पंचायत समितीने अभियानअंतर्गत सादर केलेल्या  कागदपत्रांची छाननी विभागीयस्तरीय तपासणी समितीकडून होणार आहे. 

राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी शासनाची पुरस्कार योजना आहे. यशवंत पंचायत राज अभियान सन 2017-18 अंतर्गत पंचायत राज संस्थांच्या 2016-17 मधील कामकाजावर आधारित पुरस्कार दिले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातून शिराळा व आटपाडी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेची विभागीयस्तरीय तपासणीसाठी निवड झाली होती. विभागीयस्तरीय तपासणी दि. 20 व 21 रोजी होणार आहे. कोेल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, कोल्हापूरचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ या द्विसदस्सीय समितीकडून तपासणी होणार आहे. त्यांच्यासोबत सहा तपासणी अधिकारी आहेत. 
जिल्हा परिषद व आटपाडी, शिराळा पंचायत समितीला  निकषानुसार जिल्हा परिद स्तरावर गुण दिलेले आहेत. विभागीय स्तरीय तपासणीत कागदपत्रांच्या छाननीद्वारे गुणांची पडताळणी होईल. या गुणांपेक्षा कमी/अधिक गुण झाल्यास त्याची कारणे संबंधित मुद्यासमोर नमूद करून तपासणी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर होणार 
आहे.