Sat, Feb 23, 2019 06:38होमपेज › Sangli › युथ पार्लमेंटमधून कला-गुणांना वाव

युथ पार्लमेंटमधून कला-गुणांना वाव

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 1:23AMसांगली : प्रतिनिधी

युथ पार्लमेंटच्या माध्यमातून युवकांच्या कला, गुणांना वाव मिळत आहे. असे प्रतिपादन दिग्दर्शक, गायक अवधूत गुप्ते यांनी केले. पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युथ पार्लमेंट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील होते. 

नांगरे-पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र वेगळ्या संक्रमणातून जात आहे. दंग्यात सहभागी झालेल्यांना आपण दगड मारताना तो का मारतोय हेच माहीत नसते. त्यामुळे अनेक निष्पापांचे जीवन उद्ध्वस्त होते. 

लहान मुलांच्या हातात मोबाईल म्हणजे भस्मासूर आहे. तो जसा चांगला आहे तसाच वाईटही आहे. सोशल मीडिया तर दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. युथ पार्लमेंट स्पर्धेत आतापर्यंत 42 हजार मुला, मुलींनी भाग घेतला आहे. 

यावेळी पद्मश्री विजयकुमार शहा म्हणाले, पोलिस आणि समाजाने एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. समाज सुधारायचा असेल तर आई-वडिलांनी सुधारायला हवे.  स्वागत, प्रास्ताविक पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले. ते म्हणाले, पोलिस आणि सर्वसामान्यांमध्ये फारच थोडे अंतर आहे. ते दूर झाले पाहिजे. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी आभार मानले. डॉ. पूजा नरवाडकर, प्रसन्न करमरकर, कविता घाटगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी उपअधीक्षक धीरज पाटील, नागनाथ वाकुडे, प्रकाश विरकर यांच्यासह पोलिस अधिकारी, महिला, विद्यार्थी, नागरिक, उपस्थित होते.