Thu, Apr 25, 2019 07:58होमपेज › Sangli › मदनभाऊंच्या पुतळ्याचे आज अनावरण

मदनभाऊंच्या पुतळ्याचे आज अनावरण

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 8:55PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

काँग्रेसनेते स्व. मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.  महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणार्‍या काँग्रेसनेते मदन पाटील यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा अनावरण करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी हा कार्यक्रम होणार आहे.सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे शक्तिप्रदर्शनच आहे.

महापालिकेच्या वतीने एक कोटी खर्चून माधवनगर रस्त्यावरील टीव्हीएस शोरूम समोरील खुल्या भूखंडावर स्व. मदन पाटील स्मारकाचे काम सुरू केले आहे. या स्मारकामध्ये नऊ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज जयंती दिनानिमित्त या पुतळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण आहे. 

सकाळी दहा वाजता वसंत स्फूर्तिस्थळ येथे श्रध्दांजलीचा कार्यक्रम होणार आहे. नगरसेवक राजेश नाईक यांच्यावतीने आयोजित स्मृती गंध हा भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. स्मारकात लाईफ गॅलरी आणि उद्यानाचे भूमिपूजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, खा. संजय पाटील, खा. राजू शेट्टी आदी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत. यासाठी महापालिका तसेच काँग्रेस, मदनभाऊ प्रेमी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.