Sun, Sep 23, 2018 19:57होमपेज › Sangli › तापमान वाढू लागले, उन्हाचा तडाखा 

तापमान वाढू लागले, उन्हाचा तडाखा 

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:11PMसांगली : प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे फेबु्रवारीतच मे महिन्या- प्रमाणे उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.  त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण होत आहेत. 
यंदा पावसाळा, हिवाळा हे ऋतू चांगलेच जाणवले. त्याप्रमाणे उन्हाळाही चांगलाच जाणवणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण दुपारचे कमाल तापमान 35 अंश तर पहाटेचे किमान तापमान 31 अंश झाले आहे. येत्या चार दिवसात पारा 38 अंशावर जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान वाढीचा चांगलाच परिणाम जाणवत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल, ऑईस्क्रीम, शीतपेये यांना मागणी वाढू लागली आहे. 

दरम्यान शेतकरीही शेतातील कामे सकाळ- संध्याकाळच्या टप्प्यात करीत आहेत. पिकांची पाण्याची मागणी वाढली असल्याने सतत पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे आताच पाणी टंचाईही जाणवू लागली आहे. एप्रिल, मे महिन्यामध्ये पाणी टंचाई जाणवण्याचा धोका वाढू लागला आहे.