Wed, Mar 27, 2019 00:27होमपेज › Sangli › शिष्यवृत्ती परीक्षेला पालकांचीही गर्दी

शिष्यवृत्ती परीक्षेला पालकांचीही गर्दी

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 9:24PMसांगली  : प्रतिनिधी

येथे रविवारी झालेल्या  पूर्व उच्च प्राथमिक  आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला विविध शाळांत विद्यार्थ्यांबरोबरच  पालकांनीही मोठी गर्दी केली होती. परीक्षेसाठी महापालिका क्षेत्रात 20 परीक्षा केंद्रातून  सुमारे  तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी बसलेले  होते.

या परीक्षा स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर घेतल्या जात असल्याने याचे महत्व वाढले आहे. पालक विद्यार्थ्यांची जोरदार तयार करून घेत आहेत. आज परीक्षा  केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडील त्यांना सोडण्यासाठी आले होते. शिक्षकांच्या बरोबर तेही पाल्यांना  सूचना करीत होते.  महापालिका  क्षेत्रात   पाचवीसाठी  11 परीक्षा केंद्रावर   1 हजार 927 विद्यार्थी,   आठवीसाठी 9 परीक्षा केंद्रावर 1 हजार 233 विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते. पाचवीसाठी सिटी हायस्कूल, सांगली हायस्कूल, उर्दू हायस्कूल, दामाणी हायस्कूल, सर्वोदय हायस्कूल, आर. पी. पाटील हायस्कूल, कुपवाड, कांतीलाल शहा प्रशाला, सांगली, आदर्श शिक्षण मंदिर, मिरज, मिरज हायस्कूल, मिरज, न्यू इंग्लिश स्कूल, विद्यामंदिर प्रशाला, मिरज आदी ठिकाणी परीक्षा झाली. यासाठी 11 केंद्रसंचालक आणि 95 पर्यवेक्षक 
नियुक्त करण्यात आले होते. आठवीसाठी राणी सरस्वती कन्या शाळा, दडगे गर्ल्स हायस्कूल, मालू हायस्कूल, पुरोहित कन्या शाळा, मिरजेतील ज्युबिली कन्या शाळा, आयडियल इंग्लिश स्कूल, अल्फोन्सा स्कूल, कुपवाड उपाध्ये गर्ल्स हायस्कूल येथे  परीक्षा झाली. 9 केंद्रसंचालक, 64 पर्यवेक्षक होते.