Wed, Nov 21, 2018 05:25होमपेज › Sangli › शिष्यवृत्तीच्या उत्तरपत्रिकांसाठी शिक्षणाधिकार्‍यांचे दालन ‘सीलबंद’

शिष्यवृत्तीच्या उत्तरपत्रिकांसाठी शिक्षणाधिकार्‍यांचे दालन ‘सीलबंद’

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:04PMसांगली : प्रतिनिधी

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे यांच्या दालनात ठेवल्या आहेत. दालनाचे कुलूप सीलबंद केले आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी पुण्याला नेल्या जाणार आहेत. 

पूर्व उच्च प्राथमिक शाळा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शाळा (आठवी) शिष्यवृत्तीसाठी रविवारी (दि. 18) परीक्षा झाली. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 17 हजार 325 विद्यार्थी बसले होते. आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 11 हजार 931 विद्यार्थ्यांनी दिली आहे. परीक्षा होऊन चार दिवस झाले आहेत. मात्र अजून राज्य परीक्षा परीषदेने उत्तरपत्रिका नेल्या नाहीत. या उत्तरपत्रिका शिक्षणाधिकारी वाघमोडे यांच्या दालनात ठेवल्या आहेत. हे दालन कुलूपबंद केले आहे. उत्तपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षणाधिकारी यांच्या दालनाचे कुलूप  सिल केले आहे.