Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना अटक करा

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना अटक करा

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 9:59PMसांगली : प्रतिनिधी

भीमा- कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मिलिंद एकबोटे,   संभाजी भिडे आणि आनंद दवे यांना अटक करा, त्यांचे संरक्षण काढून घ्या आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. 

संघटनेचे अध्यक्ष नामदेव करगणे, प्रमोद सांगले, नितीन कांबळे, मारुती ऐवळे, इम्रान मोमीन, राहुल रणधीर, प्रकाश होवाळ, मलमे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, भिडे, एकबोटे आणि दवे यांच्यावर गुन्हा दाखल असूनही अटक न करणे आणि संरक्षण देणे हे न्याय प्रक्रियेला न जुमानण्याचे धोरण आहे. शांततापूर्वक  संविधानिक पद्धतीने आंदोलन करणार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करणे अन्यायकारक आहे. निरपराध तरुणांचे अटकसत्र थांबवावे, बौद्ध व मराठा समाजात विवाद करणे थांबवावे.