होमपेज › Sangli › श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थानला २ कोटी ५ लाख मंजूर(Video)

श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थानला २ कोटी ५ लाख मंजूर(Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र  रेवणसिद्धला राज्याच्या  पर्यटन विकास या योजनेतून तब्बल २ कोटी ५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिलराव बाबर यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र रेवणसिद्ध (ता. खानापूर) येथे नवनाथांपैकी एक रेवण नाथ यांचे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाला अद्यावत असे भक्तनिवास व त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोई सुविधा मिळविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत होतो. श्री क्षेत्ररेवणसिद्धाच्या कृपेने ते शक्य झाले. आता या  ठिकाणी २ कोटी ५ लाख रुपये मंजूर करून आणण्यात आपणास यश आले. या ठिकाणी प्रामुख्याने भाविकांसाठी अद्ययावत असे भक्त निवास, पिण्याच्या पाण्याची सोय, इ.सर्व गोष्टींचा समावेश आहे

 बाबर म्हणाले की, श्री क्षेत्र रेवणसिद्ध हे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक येथील लोकांचे अढळ श्रद्धास्थान आहे. प्रत्येक गुरूवारी येथे हजारो भा विक येत असतात. व प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या देवाची खूपमोठी यात्रा भरत असते. हि यात्रा ५ दिवस चालते. या दिवसात येथे लाखों भाविक  भेट देत असतात. व चैत्र महिन्यात यादेवाच्या संपूर्ण परिसराला खडी घालणेम्हणजेच देवस्थानाचा संपूर्ण डोंगरास सहपरिसर पायी चालणे हि प्रथा आहे.यासाठीही येथे हजारो भाविक येत असतात.

आपण नेहमीच लोकाभिमुख व लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिलेले आहे. याच पद्धतीने आटपाडी तालुक्यातील श्री क्षेत्र खरसुंडी येथे ही लवकरच पर्यटन विकास योजनेतून भरीव निधी मंजूर करून त्याठिकाणीही सर्व सोईसुविधा पुरविणार असल्याचे सांगत या कामी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावर यांचे सहकार्य लाभल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 


  •