होमपेज › Sangli › वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या मुंबईत अधिवेशन

वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या मुंबईत अधिवेशन

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:36PMसांगली प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन शनिवारी ( दि. 27 जानेवारी) मुंबई येथे होत आहे. या अधिवेशनात सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते  सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सागर शिवगोंड खोत, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संघटन सचिव रघुनाथ कांबळे, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मारूती नवलाई यांनी दिली. 

त्यांनी माहिती दिली ती अशी वृत्तपत्र विक्रेता-एजंट कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांवर चर्चा करून ठोस निर्णय या अधिवेशनात घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यास राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील गावा-गावातील विके्रते व एजंट उपस्थित राहणार आहेत. 

 महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही एजंट-विक्रेते यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारी  संघटना आहे. विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. वृत्तपत्र व्यवस्थापनासह शासनाकडे सतत पाठपुरावा करीत प्रश्न मार्गी लावले आहेत. यापुढेही अनेक कामे करायची आहेत. त्यासाठी आपली एकजूट आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यास जायचे आहे.

सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, संघटक सचिन चोपडे, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, श्रीपती शियेकर, परशराम सावंत, महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शंकर चेचर, रवी लाड, सुरेश ब्रम्हपुरे, अंकुश परब, राजाराम पाटील, बजरंग पाटील, सागर रुईकर, संदीप चोपडे, सुनिल समडोळीकर, सतिश दिवटे, धनंजय शिराळकर, रमेश जाधव, बाळासो अवघडे, किसन शहापुरे, अनिल कोरवी, संजय बुचडे, इचलकरंजीचे आण्णा गुंडे, सातारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, पंढरपूर शहर संघटना अध्यक्ष महेश पटवर्धन, सचिव विकास पवार, उत्तम चौगुले, सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वृत्तपत्र विक्रेते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. आगामी लढ्यात सहभागी होणार आहेत.