Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Sangli › सांगली : आरक्षणाच्या बाजारात राष्ट्रवादीचीच आघाडी 

सांगली : आरक्षणाच्या बाजारात राष्ट्रवादीचीच आघाडी 

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

आरक्षणे उठविण्याचा बाजार करण्यात आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवकच महासभेत या विषयाला विरोधाचा थयथयाट करण्यातही आघाडीवर होते, असा आरोप महापौर हारुण शिकलगार यांनी पत्रकार बैठकीत केला. त्यांनी त्याचे पुरावेही सादर केले. 

ते म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून 18 उपसूचनांद्वारे 34 आरक्षणे उठविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच दहापेक्षा अधिकजण असल्याचे नावासह त्यांनी जाहीर केले. गोंधळ घातला तरी जेथे खरोखरच घरे आहेत त्यांचा विचार करूनच फक्‍त तेथील आरक्षणे उठवू.

गुंठेवारीतील घरे बाधित होत असल्याच्या कारणावरून  जानेवारी महिन्यातील महासभेत उपसूचनेद्वारे तब्बल 34 आरक्षणे उठवण्यात आली. यावर काँग्रेसने आरक्षणाचा बाजार मांडल्याचा आरोप केला होता. यावरून महासभेत त्यांनी विरोधही केला. याबद्दल शिकलगार म्हणाले, राष्ट्रवादीच्याच सर्वाधिक नगरसेवकांनी आरक्षणे उठवण्याची उपसूचना दिली आहे. यामध्ये महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात शहराच्या भवितव्यासाठी ठेवण्यात आलेली क्रीडांगणे, रस्ते, उद्याने, प्राथमिक शाळा आदी आरक्षणे उठविण्याची सूचना केली आहे.

ते म्हणाले, आरक्षणे उठवण्याबाबत नगरसेवकांनी उप सूचनेव्दारे मागणी केली आहे. मात्र पालिकेच्या अधिकार्‍यांना या आरक्षित जागांचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी 70 टक्के पेक्षा जास्त घरे झाली आहेत. तेथीलच आरक्षणे उठवण्यात येणार आहेत. मोकळ्या जागेवरील एकही आरक्षण उठवणार नाही. याबबात प्रशासनाचा अभिप्राय, कायदेशीर मत घेऊनच निर्णय घेणार आहे.

खुल्या जागांवरील आरक्षणे उठविण्यास विरोध : मोहिते

 विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते म्हणाले, मागील सभेत महापौरांनी आरक्षण उठवण्याचा ठराव घुसडला त्याला आमचा विरोध होता. ज्या जागेवर घरे झाली आहेत. तेथील आरक्षणे उठवावीत. मात्र मोकळ्या जागांवरील आरक्षणे उठवण्यास आमचा विरोध आहे. 

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याबाबत केलेल्या उपसूचना योग्य आहेत. जर आमच्यातील कोणी मोकळ्या जागेवरील आरक्षण उठवत असेल तर त्यांना पक्षामार्फत समज दिली जाईल.  

नगरसेवक आणि त्यांच्या उपसूचना

नाव                 सर्व्हे क्र.         आरक्षण     

मैनुद्दीन बागवान         3699            शाळेचे आरक्षण रद्द करा
शुभांगी देवमाने            3054, 3054/अ     डीपी रस्ता  रद्द करा
प्रार्थना मदभावीकर    8             रुग्णसेवा प्रकल्प  रद्द करा
राजू गवळी             वॉर्ड 32             डीपी रस्ता   रद्द करा
प्रार्थना मदभावीकर    3376,3537         पार्किंग रद्द करा
प्रार्थना मदभावीकर     3539,3540,        पार्किंग रद्द करा
प्रार्थना मदभावीकर     3541, 3548         पार्किंग  रद्द करा
युवराज गायकवाड         132,133        डीपी रस्ता रद्द करा
पांडुरंग भिसे             768, 4140       शाळा, क्रीडांगण रद्द करा
संगीता खोत         876, 749      शाळा, पार्किंग आरक्षण रद्द करा
संगीता हारगे             7501 ते 3        डीपी रस्ता रद्द करा
संगीता हारगे             6168, 6169        डीपी रस्ता  रद्द करा
गुलजार पेंढारी           58चा काही भाग         क्रीडांगण, शाळा    रद्द करा
कांचन भंडारे            25          डीपी रस्ता  रद्द करा
कांचन भंडारे             876            क्रीडांगण रद्द करा
कांचन भंडारे             794             ट्रक पार्किंग रद्द करा
सुरेश आवटी             123             डीपी रस्ता     रद्द करा
सुरेश आवटी             146/3, 742        हायस्कूल क्रीडांगण  रद्द करा
वंदना कदम            13/5, 13/क         उद्यान द्द करा
प्रशांत तायगोंडा पाटील  3501,3507        डीपी रस्ता  रद्द करा
प्रशांत मजलेकर         121/2             ट्रक पार्किंग  रद्द करा