Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Sangli › सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा

Published On: Aug 03 2018 8:16AM | Last Updated: Aug 03 2018 6:18PMसांगली : प्रतिनिधी

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत अखेर सत्तांतर झाले आहे. काॅंग्रेस- राष्ट्रवादी अाघाडीला धक्का देत भाजपने सत्ता मिळवली अाहे. एकूण ७८ जागांपैकी भाजपने ४१ जागांवर विजय मिळवला. तर काॅंग्रेसला २० तर राष्ट्रवादीला १५ अाणि स्वाभिमानी विकास अाघाडी अाणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर समाधाने मानावे लागले अाहे.

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेवर काॅंग्रेसची सत्ता होती. मात्र, भाजपने अाता सत्ता खेचून अाणली अाहे. या निवडणुकीसाठी एकूण ६२.१७ टक्‍के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ४५१ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली. सायंकाळी साडेचारपर्यंत सर्व निकाल हाती आले. 

काँग्रेस-राष्‍ट्रवादीने निवडणूक एकत्र लढविली. भाजपसह शिवसेना, जिल्‍हा सुधार समिती, लोकशाही आघाडी, स्‍वाभिमानी विकास आघाडी मैदानात होते. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली होती. २०१३ मध्ये काँग्रेस ४१, राष्‍ट्रवादी काँग्रेस १९, भाजपप्रणित स्‍वाभिमानी आघाडी ८, मनसे १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल होते. 

पाहा ► सांगली-मिरज-कुपवाड महापालिका प्रभाग निहाय विजयी उमेदवार

अपडेट : 

मिरजेत प्रभाग पाचमध्ये इद्रीस नायकवडी यांचा १७९ मताने धक्कादायक पराभव, काँग्रेसचे करण जामदार चुरशीच्या लढतीत विजयी

भाजपची जोरदार मुसंडी, ३६ जागांवर विजय तीन ठिकाणी आघाडीवर तर काँग्रेस १० आणि राष्‍ट्रवादीचा १३ जागांवर विजय

भाजप उमेदवार माजी महापाैर विवेक कांबळे पराभूत. राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांचा ६ मतांनी विजय

भाजपची मुसंडी, ३२ जागांवर विजय तर काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी २३ ठिकाणी विजयी

प्रभाग ४ मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी; अनिल कुलकर्णी यांच्या पेक्षा दुप्पट मतांनी निरंजन आवटी विजयी

सांगली २० पैकी १२ प्रभागाचा निकाल जाहीर; भाजप २७, काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी १८ तर अपक्ष २ जागांवर विजयी

सांगली : गव्हर्मेंट कॉलनी प्रभाग १९ मधून सर्व भाजप उमेदवार विजयी. विद्यमान नगरसेवक युवराज गायकवाड, कांचन भंडारे, प्रियांका बंडगर पराभूत

भाजप २३, काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी १८ जागांवर विजयी

प्रभाग १७ मध्ये भाजपच्या गीता सुतार, गितांजली सूर्यवंशी, लक्ष्‍मण नवलाई तर राष्‍ट्रवादीचे दिग्‍विजय सूर्यवंशी विजयी

सांगलीवाडीत भाजपचे अजिंक्य पाटील आघाडीवर

मिरजेत भाजप ८, राष्ट्रवादी ४ जागांवर विजयी. याच ठिकाणी भाजप ४ जागांवर अाघाडीवर आहे.

प्रभाग ७ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी; आनंदा देवमाने, संगिता खोत, गायत्री कुल्‍लोली, गणेश माळी विजयी

काँग्रेसला धक्का गटनेते किशोर जामदार पराभूत. भाजपचे गणेश माळी विजय़ी

प्रभाग ७ मध्ये भाजपचे ४ उमेदवार विजयी

नाना महाडिक यांची कन्या रोहिणी पाटील विजयी

प्रभाग १ चा निकाल : 

अ गटात राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते हे 6714 मते मिळवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रविंद्र सदामते याना 5420 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.
ब गटात राष्ट्रवादीच्या रईसा रंगरेज यांना 6049 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या तर भाजपाच्या माया गडदे यांना 3868 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. 
क गटात काँग्रेसच्या पद्मश्री प्रशांत पाटील यांना 7404 मते मिळाली त्या विजयी झाल्या असून भाजपाच्या सिंधूताई जाधव यांना 4098 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला. 
ड गटात स्वाभिमानी आघाडीचे विजय घाडगे यांना 4497मते मिळाली ते विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ धनपाल खोत यांना 4277 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.

 

खासदार संजय काका पाटील यांना धक्का; प्रभाग १५ मधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी

प्रभाग ९ मध्ये संतोष पाटील, मदिना बारुदवाले, मनगू सरगर (राष्‍ट्रवादी) आणि रोहिणी पाटील (काँग्रेस) विजयी

प्रभाक १ मध्ये विजय घाडगे अपक्ष, शेडजी मोहिते राष्‍ट्रवादी, रईसा रंगरेज राष्‍ट्रवादी, पद्मश्री पाटील काँग्रेस विजयी

प्रभाग ७ मध्ये भाजप २ आणि काँग्रेस २ जागी आघाडीवर

प्रभाग ६ मध्ये राष्‍ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान, सय्‍यद नरगीस, रझीया काझी आणि अतहर नायकवडी विजयी

प्रभाग तीनमध्ये चारही जागांवर भाजपची आघाडी

भाजप ८, काँग्रेस ७, राष्‍ट्रवादी काँग्रेस ५, स्‍वाभिमानी विकास आघाडी १ठिकाणी विजयी

प्रभाग सहामध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्व चारही उमेदवार विजयी

प्रभाग ६ ब मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नरगिस सय्यद विजयी

प्रभाग ६ अ  मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मैनुद्दीन बागवान विजयी

प्रभाग १५ मधून काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीचे शेडजी मोहिते, राईसा रंगरेज, पदमश्री पाटील आणि विजय घाडगे विजयी

प्रभाग क्रमांक १५ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी

काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी १६, भाजप ११ तर इतर एक ठिकाणी आघाडीवर

सांगली : प्रभाग ९  मध्ये नाना महाडिक कन्या रोहिणी पाटील मागे.

मिरज प्रभाग ६ मध्ये अपक्ष उमेदवार अल्लाउद्दीन काझी विजयी

भाजप ७, काँग्रेस ५ आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस ५ ठिकाणी आघाडीवर

प्रभाग १२ मध्ये भाजपचे ४ उमेदवार आघाडीवर.

प्रभाक क्रमांक ६ मधून अपक्ष काझी, प्रभाग क्रमांक ३ ड गटातून काँग्रेस, प्रभाग १५ क मधून भाजप आघाडीवर

वॉर्ड क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल आघाडीवर

भाजप ६, काँग्रेस ५, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४, अपक्ष १ ठिकाणी आघाडीवर आहे

मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप तीन, राष्ट्रीय काँग्रेस तीन, राष्ट्रवादी दोन, तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर

काँग्रेसचे तीन, भाजप एका जागेवर आघाडीवर

मतमोजणीस सुरुवात होत असून सांगली, मिरज परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीसाठी महत्त्‍वाची निवडणूक

भाजपकडून निवडणूक प्रतिष्‍ठेची; पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विशेष लक्ष

भाजप, शिवसेना, जिल्‍हा सुधार समिती, लोकशाही आघाडी पहिल्यांदाच तर स्‍वाभिमानी विकास आघाडी दुसर्‍यांदा मैदानात

४५१ उमेदवारांतून ७८ जण होणार नगरसेवक

महापालिका निवडणुकीची पाचवी टर्म; काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसची आघाडी

मिरजमधील शासकीय गोदामात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्‍ज

आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात