Mon, Aug 19, 2019 05:25होमपेज › Sangli › मिरज दंगल; नेत्यांविरोधातील खटल्याबाबत रिव्हीजन दाखल

मिरज दंगल; नेत्यांविरोधातील खटल्याबाबत रिव्हीजन दाखल

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 11:34PMसांगली : प्रतिनिधी

मिरजेत 2009 मध्ये गणेशोत्सवाच्या काळात दंगल झाली होती. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे यांच्यासह 51 लोकांवर चिथावणी दिल्याप्रकऱणी खटला दाखल होता. मात्र सत्तेत आल्यानंतर या मंडळींनी  तो रद्द करण्यास भाग पाडले आहे. 

तो आदेश रद्द करून खटल्याची पुन्हा सुनावणी घेण्यासाठी जिल्हा न्यायालयात रिव्हीजन दाखल केल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यांनी  पत्रकात म्हटले आहे की, सरकारी वकिलांनी कोणत्याही प्रकारे या प्रकरणाचे विवेचन न करता, कागदोपत्री पुरावा न पाहता, साक्षीदाराचे तपास टिपण न वाचता, प्रकरणाचे व गुन्ह्याचे गंभीर स्वरूप न पाहता, समाजामध्ये होणार्‍या वाईट परिणामांची काळजी न घेता केवळ राजकीय दबावामुळे  खटला रद्द  केला आहे. 

या दंगली संदर्भातील संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी आम्ही गेले तीन महिने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहोत. परंतु जिल्हा प्रशासन जाणीवपूर्व आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.

एकट्या मिरज शहर पोलिस ठाणेअंतर्गत दंगलीची 40 प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. मात्र फक्त संबंधित राजकीय नेत्यांवरील खटला मागे घेण्याचा आदेश नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरूध्द आहे, असेही तांबोळी यांनी  पत्रकात म्हटले आहे.