Wed, Sep 26, 2018 12:13



होमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला दहा वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला दहा वर्षे सक्तमजुरी

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 11:33PM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

मिरजेत राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी, वीस हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न दिल्यास एक महिना सक्तमुजरीची शिक्षा देण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.  एस. एस. सापटणेकर यांनी हा निकाल दिला.  

गिरीष पुरषोत्तम गुमास्ते (वय 45, रा. ब्राह्मणपुरी, अष्टेकर वाडा, समर्थ चौक, मिरज) असे आरोपीचे नाव आहे. दि. 4 ऑगस्ट 2015 रोजी पीडित मुलीला रात्री गुमास्ते याने कारमध्ये बसवून तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर दुसर्‍यादिवशी रात्री नऊच्या सुमारास पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तो घरात शिरला. त्यावेळी त्याने पीडितेवर बलात्कार केला होता. 

मिरज शहर पोलिस ठाण्यात गुमास्तेविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दि. 22 रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्या. सापटणेकर यांनी गुमास्ते याला दोषी धरले होते. यावर शुक्रवारी अंतिम सुनावणी घेण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.