Tue, Mar 19, 2019 20:44होमपेज › Sangli › पाणी चोरी रोखण्यासाठी हजेरीवर ठेवली माणसे 

पाणी चोरी रोखण्यासाठी हजेरीवर ठेवली माणसे 

Published On: May 13 2018 5:19PM | Last Updated: May 13 2018 5:19PMमांजर्डे :वार्ताहर

तासगाव तालुक्यातील पूर्व भागास सध्या विसापूर उपसा योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे परंतु या योजनेच्या पाण्याची अनेक शेतकऱ्यांकडून चोरी सुरू आहे. रात्रीच्या वेळी पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विसापूर (भालेखडा)उपसा टप्पा क्रमाक दोन मधून सध्या लोंढे तलावात पाण्याचे आवर्तन सुरू आहे.  यासाठी पाच गावातील शेतकऱ्यांनी पैसे भरून पाणी घेतले. पण यामध्ये मांजर्डे परिसरातील  काही शेतकरी रात्रीच्या वेळीस पाईपलाईनचा व्हॉल निकामी करून पाणी चोरी करीत आहेत. या व्हॉल ला पाईप जोडून हे पाणी विहीर किंवा शेतात सोडण्यात येत आहे. ही चोरी रोखण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आले आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पाच गावातील शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

पाणी राखण्यासाठी हजेरीवर माणस

लोंढे तलावात आरवडे, डोर्ली, कौलगे, लोंढे, सावर्डे या गावातील शेतकऱ्यांनी पैसे भरून पाणी घेतले आहे. या पाण्याची सतत शेतकऱ्यांकडून चोरी केली जात आहे. ही चोरी शेतकर्‍यांकडून आजा हजेरीवर माणसे ठेवण्यात आली आहेत.