Wed, Nov 14, 2018 07:59



होमपेज › Sangli › कृषी महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करा

कृषी महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करा

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 8:47PM



सांगली : प्रतिनिधी

प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी  आणि अन्य शेतकरी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना होणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा कृषि महोत्सवाचे  सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि महोत्सव आयोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.

खोत म्हणाले, इस्लामपूर येथे फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होणारा कृषि महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करावी. या समित्यांमध्ये विविध संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश करावा.

खोत म्हणाले, या कृषि महोत्सवासाठी प्रमाणित कृती आराखडा तयार करावा. कृषि महोत्सवामध्ये उभारण्यात येणार्‍या स्टॉल्समधून शेतकर्‍यांना अद्ययावत तांत्रिक उत्पादनांची माहिती व्हावी, यासाठी प्रयत्न करावा.

दि. 26 जानेवारीस ग्रामसभांत  महोत्सवाबाबत माहिती द्यावी.  कृषि प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, जोडधंदे, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषि मालाची आयात-निर्यात अशा अनेक बाबींची अद्ययावत माहिती होण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करावे, अशा सूचनाही खोत यांनी यावेळी दिल्या. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ, आत्माचे चंद्रकांत जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होेते.