Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Sangli › क्रांतिमोर्चाप्रमाणे लिंगायत महामोर्चाही यशस्वी करू

क्रांतिमोर्चाप्रमाणे लिंगायत महामोर्चाही यशस्वी करू

Published On: Dec 01 2017 11:48PM | Last Updated: Dec 01 2017 8:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मराठा क्रांतीमोर्चाचा अनुभव पूर्ण पाठीशी लावून लिंगायत बांधवांचाही महामोर्चा यशस्वी करू. त्यासाठी संपूर्ण ताकद पाठीशी लावू, असा निर्धार काँग्रेसनेते माजी मंत्री प्रतीक पाटील, युवानेते विशाल पाटील, भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदींनी व्यक्त केला. यासाठी प्रत्यक्ष नियोजनात सहभागी होऊन त्यांनी बैठकाही घेतल्या.

प्रतीक पाटील यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नियोजनासंदर्भात चर्चा केली. श्री. पाटील यांनी मोर्चाच्या समन्वय समिती पदाधिकारी यांच्यासमवेत पोलिस अधीक्षक सुहेश शर्मा यांच्याशी बैठक घेऊन मोर्चा नियोजनाची रिहर्सलही घेतली. यावेळी आदीनाथ मगदूम, सुनील तिवले, प्रदीप वाले, सुधीर सिंहासने, विश्‍वनाथ मिरजकर, सुशील हडदरे, विनायक शेटे, प्रदीप दडगे, समन्वय समितीचे सचिव सतीश मगदूम, रवींद्र केंपवाडे, आप्पा रिसवडे, डी. के. चौगुले, राजेंद्र  लंबे, सचिन घेवारे आदी उपस्थित होते.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे हेही महामोर्चात स्वत: उतरणार असल्याचे पक्षाध्यक्ष समित कदम यांनी सांगितले. त्यांनी नियोजनासाठी बैठका घेऊन जय्यत तयारी केल्याचेही समित कदम म्हणाले. यावेळी अनिल पुजारी, सुनील बंडगर, उदय कदम, नितीन पाटील, मदन तांबडे, विशाल कोळेकर, दीपक कलगुटगी, अमोल सातपुते, उदय कांबळे,  दीपक कांबळे  आदी उपस्थित होते.