Tue, Apr 23, 2019 01:52होमपेज › Sangli › अनिकेतचा मृतदेह कुटुंबिय घेणार ताब्‍यात

अनिकेतचा मृतदेह कुटुंबिय घेणार ताब्‍यात

Published On: Jan 10 2018 7:12PM | Last Updated: Jan 10 2018 7:12PM

बुकमार्क करा
सांगली  : प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्‍या अनिकेत कोथळेचा बडतर्फ पीएसआय युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी पोलिस कोठडीतच खून केला होता. या प्रकरणामुळे राज्‍यात खळबळ उडाली होती. दरम्‍यान, अनिकेतचा मृतदेह मिरज शासकीय मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी ठेवण्यात आला होता. उद्या गुरूवारी अनिकेतचा मृतदेह त्‍याच्या कुटुंबियांकडे अंत्‍यसंस्‍कारासाठी देण्यात येणार आहे. दरम्‍यान, उद्या (गुरुवार, ११ जानेवारी) मिरज शासकीय मेडिकल कॉलेजच्या ताब्‍यातून कोथळे कुटुंबिय अनिकेतचा  मृतदेह अंत्‍यसंस्‍कारासाठी ताब्‍यात घेणार आहेत.

६ नोव्हेंबर २०१७ ला बडतर्फ पीएसआय युवराज कामटेने आपल्या पोलिस साथीधारांच्या मदतीने अनिकेत कोथळेची पोलिस कोठडीतच हत्‍या केली होती. त्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे त्याचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कामटेसह सहाजणांना अटक करण्यात आली. यानंतर अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. 

त्यानंतर डीएनए चाचणीसाठी तो पुण्यातील न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. या अहवालात तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे सिद्ध झाल्याचे सीआयडीचे महासंचालक संजयकुमार यांनी सांगितले होते. कोथळे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांची भेट घेऊन डीएनए अहवाल आल्यानंतरच अस्थि ताब्यात घेणार असल्याचे सांगितले होते.