सांगली : वार्ताहर
विजयनगर येथील नवीन न्यायालय इमारतीचे उद्घाटन दि. 11 मार्चरोजी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती श्रीमती विजया ताहीलरमाणी यांच्याहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. शैलेंद्र हिंगमिरे यांनी दिली.
सकाळी 11 वाजता उच्च न्यायालयाचे सांगलीचे पालक न्यायमूर्ती रणजित मोरे, पालकमंत्री सुभाष देखमुख, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे व जिल्ह्यातील सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अॅड. हिंगमिरे यांनी दिली.