Mon, Apr 22, 2019 03:46होमपेज › Sangli › ‘चांदोली’ विकासासंदर्भात ३० रोजी महत्त्वपूर्ण बैठक

‘चांदोली’ विकासासंदर्भात ३० रोजी महत्त्वपूर्ण बैठक

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 10:12PMसांगली : प्रतिनिधी

चांदोली येथील पर्यटन विकासासंदर्भात पर्यटन विकास महामंडळ, कृष्णा खोरे, पाटबंधारे, वन आदी विभागाची बैठक 30 जानेवारी रोजी चांदोली येथे होणार आहे.    जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील अध्यक्षस्थानी आहेत.   

चांदोली धरण आणि चांदोली अभयारण्य परिसर पर्यटन विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिला आहे. या परिसराच्या विकासासंदर्भात अनेक वेळा चर्चा झाली. मात्र प्रत्यक्ष कृती झालेली नाही. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक यांनी जिल्हाधिकारी पाटील यांची भेट घेऊन या परिसराच्या विकासासंदर्भात चर्चा केली. चांदोली येथे कृष्णाखोरे महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणात आहे. या जागेचा उपयोग करून घेता येणार आहे.  जायकवाडी धरणालगत पैठण येथे  उद्यान, कारंजे आहेत त्या प्रमाणे येथील भाग विकसित होऊ शकतो.  वन्य प्राणी, पक्षी   पाहण्यासाठी व्यवस्था करणे, पर्यटकांना राहण्यासाठी  निवास व्यवस्था आदी कामे अपेक्षित आहेत.