Wed, Jan 23, 2019 04:29होमपेज › Sangli › सरकारची धोरणे कामगार, शेतकरीविरोधी

सरकारची धोरणे कामगार, शेतकरीविरोधी

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 9:56PMसांगली : प्रतिनिधी

केंद्र व राज्यातील शासन  कामगार, शेतकरीविरोधी आहे. सरकारची धोरणे पाहता  संविधानालाच धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांच्यावतीने 26 जानेवारीरोजी मुंबईत संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार बैठकीत दिली.  कॉ. शंकर पुजारी, सुमन पुजारी उपस्थित होते. 
 काँगो  म्हणाले, असंघटित कामगारांनी संप पुकारलेला आहे. त्यांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व कामगार कायद्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. असे देशात एक कोटी कामगार आहेत. त्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. बांधकाम कामगारांसाठी 6500 कोटी रुपये राज्य शासनाकडे जमा आहेत. परंतु सरकार त्यांच्यासाठी खर्च करीत नाही. कामगारांना न्याय देण्याऐवजी एसटीचे खासगीकरण करून नोकर्‍या कमी करण्याचा प्रयत्न सुरू  आहे. 

सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही 

ते म्हणाले, सर्वच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष  आहे.  सरकारच्याविरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. 

शिक्षणाचे बाजारीकरण गंभीर

महाराष्ट्र राज्य शिक्षणामध्ये अग्रेसर होते. परंतु सरकार शिक्षणाचे खासगीकरण आणि आता कंपनीकरण करीत आहे. 1300 शाळा बंद केल्या आहेत.  आम्ही विद्यार्थी संघटनांना एकत्र करून शासनाच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत.