Sat, Nov 17, 2018 10:34होमपेज › Sangli › अर्धा सांगली जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात          

अर्धा सांगली जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात          

Published On: Mar 15 2018 8:02PM | Last Updated: Mar 15 2018 8:02PMसांगली : प्रतिनिधी

                                                          
जिल्ह्यातील 285 गावांमध्ये शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये मिरज तालुक्यातील 39, कवठेमहांकाळ - 60, तासगाव - 69, जत - 50 तर खानापूर तालुक्यातील 67 गावांचा समावेश आहे. गेल्या खरीप हंगामात 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी असल्याने या गावांना टंचाईतील सवलतींचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी विजयकुमार - काळम पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या निमित्ताने जवळपास अर्धा जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात भरडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.    

मात्र दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या  आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यामध्ये समावेश नाही. गेल्या वर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. शेतकर्‍यांनी मशागती केल्या.काहींनी खरीप पेरणीही केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली, त्यामुळे पेरणी वाया गेली. शेवटच्या टप्प्यात मात्र जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र शेतीच्या एकूण उत्पादनात घट झाली. शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला. 

महसूल, कृषी विभागाने नोव्हेंबरमध्ये पीक पाहणी अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यात खरीप हंगामात जिल्ह्यातील 285 गावांत 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी असल्याचे नोंदवण्यात आले होते. मात्र अन्य बहुतेक भागात सरासरीच्या 70 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मदतीच्या निकषातून ही गावे वगळण्यात आली होती. आता या गावांना मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यांना विविध उपाययोजना लागू केल्या आहेत.