Sun, May 26, 2019 15:39होमपेज › Sangli › ‘शिक्षण संकटात’; ७३ संघटना एकत्र

‘शिक्षण संकटात’; ७३ संघटना एकत्र

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:11PMसांगली : प्रतिनिधी

शिक्षणाचे खासगीकरण, कंपनीकरणविरोधात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत. रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता पुण्यात सिंहगड रोड, नाथ पै सभागृह, साने गुरूजी स्मारक, पर्वती पायथा येथे राज्यस्तरावरील विविध 73 संघटना पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. 

शिक्षण आणि विद्यार्थी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विरोधात शासन धोरणांवर चर्चा करून संयुक्‍त कृती कार्यक्रम ठरविला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्‍त शिक्षण परिषद होणार आहे. 

शिक्षक व पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, कपिल पाटील, विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, सतीश चव्हाण, श्रीकांत देशपांडे, माजी आमदार यु. डी. डायगव्हाणे, जे. यु. ठाकरे तसेच शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीस या 73 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार

संस्थाचालक संघटना महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ, मुख्याध्यापक संयुक्‍त महामंडळ, शिक्षण हक्क कृती समिती, मायनॉरिटी शिक्षण संस्थाचालक. प्राथमिक शिक्षक संघटना- शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट), शिक्षक समिती, शिक्षक भारती, उर्दू शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, मागासवर्गीय शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक समिती, शिक्षक एकल मंच, बृहन्मुंबई शिक्षक सभा, पालिका शिक्षक संघ, केंद्रप्रमुख असोसिएशन, स्वाभिमानी शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, खासगी प्राथमिक संघटना, शिक्षक सेना, सेवक समिती, बहुजन टिचर्स, बहुजन महासंघ, माध्यमिक संघटना- टीडीएफ, शिक्षक संघ, विदर्भ संघ, शिक्षक भारती, मुंबई महापालिका संघ, समाजवादी अध्यापक, स्वराज्य शिक्षक, उर्दू शिक्षक, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, आदिवासी शिक्षक संघटना, वसंतराव नाईक शिक्षक संघटना, कायम विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालयीन, रिपब्लिकन एम्प्लॉईज व अन्य संघटना. विद्यार्थी संघटना- स्वाभिमानी विद्यार्थी, एसएफआय, छात्रभारती, एनएसयुआय, विद्रोही, रिपब्लिकन विद्यार्थी सेवा, पालक संघ- आरटीई पालक संघ, आरटीई फोरम, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, पालक हक्क समिती, शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व अन्य संघटना.