Thu, Jun 27, 2019 02:23होमपेज › Sangli › मंडल अधिकार्‍यासह निवृत्त तलाठ्याला रंगेहात अटक

मंडल अधिकार्‍यासह निवृत्त तलाठ्याला रंगेहात अटक

Published On: Sep 02 2018 1:17AM | Last Updated: Sep 02 2018 12:50AMसांगली : प्रतिनिधी

जमिनीची फेरफार रजिस्टरला नोंद घालून उतारा देण्यासाठी मंडल अधिकार्‍याच्या सांगण्यावरून दोन हजारांची लाच घेताना निवृत्त तलाठ्यासह दोघांना अटक करण्यात आली. शनिवारी सायंकाळी मिरजेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. मंडल अधिकारी सुनील बाबुराव पाटील (वय 48), निवृत्त तलाठी आप्पासाहेब भूपाल चौगुले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदाराची सोनी (ता. मिरज) येथे जमीन आहे. त्या जमिनीचा दिवाणी दावा सुरू होता. त्या जमिनीच्या हिश्याबाबत न्यायालयाचा हुकुमनामा झाला आहे. त्यानुसार जमिनीची फेरफार रजिस्टरला नोंद करून उतारा घेण्यासाठी तक्रारदार सुनील पाटील यांच्याकडे गेले होते. त्यावेळी पाटील यांनी त्यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली. नंतर दोन हजार रूपये तातडीने घेऊन येण्यास सांगितले. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचला. पाटील यांनी सांगितल्यानुसार दोन हजार रूपये घेऊन तक्रारदार गेल्यानंतर त्यांना निवृत्त तलाठी चौगुले यांच्याकडे रक्कम देण्यास सांगण्यात आले.  चौगुले यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. नंतर दोघेही मोटारसायकलवरून मिरजेतील महात्मा गांधी चौक परिसरात रक्कम स्विकारताना चौगुले यांना रंगेहात पकडण्यात आले. 

याप्रकऱणी मंडल अधिकारी पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.