Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Sangli › सांगली : बनाळी येथील श्री बनशंकरी देवस्थान  

सांगली : बनाळी येथील श्री बनशंकरी देवस्थान  

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 28 2018 2:58PMयेळवी :  विजय रुपनूर

जत तालुक्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे आहेत. जत शहरापासून  उत्तरेस ११ किलोमीटर बनाळी हे गाव पाच ते सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावालगतच  डोंगराच्या कुशीत गर्द  हिरवेगार  बन आहे. या गर्द वनराईत श्री बनशंकरीचे देवस्थान आहे.

जत  तालुक्यात  वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन

 दुष्काळी भागात  बसलेले हे ठिकाण  सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारी बाजूला छोट्‍या टेकडया, मधोमध असणार्‍या दर्‍यामध्‍ये  वेगवेगळे वृक्षांनी गर्दी केली आहे.  या परिसरात दोन  मोठ्या विहिरी आसून एका विहीरीतून बनाळी गावास पाणीपुरवठा केला जातो.  तर दुसर्‍या विहिरीने देवस्थान परिसरातील झाडे व इतर वापराकरिता पाण्याचा पुरवठा  केला जातो. जत  तालुक्यात  वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन आहे. आकर्षक अशी श्री बनशंकरीची मूर्ती पाहावयास मिळते.

 बनाळी शुध्द शाकाहारी गाव 

बनशंकरी देवी जागृत देवस्थान आहे. या गावचं वैशिष्टय़ म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडणार नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर जंगलातील मधमाशा हल्ला करतात, अशी अख्यायिका सांगितली जाते. 

भीतीपोटी गावात  मांसाहार केला जात नाही

काही जणास अनुभव आल्याने सहसा कोणी मांसाहार करुन याठिकाणी जाणेचे धाडस करत नाही.  गावात जाणारा पाहुणा असेल तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचं ग्रामस्थांनी प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. त्यामुळे भीतीपोटी गावात कोणीही मांसाहार करत नाही.  

शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात. दर शुक्रवारी या ठिकाणी महाप्रसादचे आयोजन केले जाते. दसरा सणावेळी येथे यात्रा असते.

जाण्‍याचा मार्ग

जतपासून बारा किलोमीटर अंतराचर बनाळी गाव आहे. यासाठी बसची सोय आहे.