Wed, Jun 03, 2020 17:26होमपेज › Sangli › डीएनए अहवालास अजून आठ दिवस

डीएनए अहवालास अजून आठ दिवस

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 11:17PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

c याच्या  डीएनए  चाचणीचा अहवाल आठ दिवसानंतर येईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीआयडीच्या अधिकार्‍यांना  देण्यात आली आहे. दरम्यान सायबर क्राईम विभागाने या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईल आणि टेलिफोनचे कॉल डिटेल्स ताब्यात घेतले आहेत.  त्यानुसार माहिती जमा करण्यात येत आहे. 

अनिकेतचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची आंबोली येथे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र  हे प्रकरण चव्हाट्यावर आले. त्यानंतर  तो मृतदेह जागेवर जाऊन ताब्यात घेण्यात आला होता. मात्र तो  अनिकेतचाच आहे का ते तपासण्यासाठी मृतदेहाचे नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत  तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.  या गुन्ह्यातील डीएनए चाचणी अहवाल हा  मुख्य पुरावा आहे. त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष आहे. अनिकेतच्या कुटुंबियांकडूनही डीएनएचा अहवाल अद्याप का आला नाही, अशी विचारणा सीआयडीकडे सतत होत आहे. सीआयडीच्या अधिकार्‍यांचाही  या अहवालासाठी पाठपुरावा सुरू आहे.

या अधिकार्‍यांनी गुरुवारी पुणे येथे प्रयोगशाळेस भेट देऊन अहवालबाबत माहिती घेतली. त्यावर त्यांना अहवालास अजून आठ दिवस लागतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तो उपलब्ध होईल, अशी अपेक्षा अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे येथील सायबर क्राईमच्या पथकाने सांगली, आंबोली येथे भेट देऊन माहिती घेतली होती. त्यानुसार या गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींचे कॉल डिटेल्स त्यांनी जमा केले आहेत. त्यानुसार सीआयडीचे अधिकारी आता संबंधितांचा या गुन्ह्यात किती संबंध होता, याची तपासणी करीत आहेत. 

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा मोबाईल मिळाला नसला तरी त्याच्या मोबाईचे कॉल डिटेल्स काढण्यात आले आहेत. त्याने घटनेच्या काळात किंवा नंतर कुणाला फोन केले होते, त्याची माहिती काढण्यात येत आहे. त्यानुसार संबंधीतांना बोलावून जबाब घेण्यात येणार आहेत. कृष्णा नदीघाटावर थांबलेल्या दोघांची माहिती त्यातूनच मिळेल, असे अधिकार्‍यांचे म्हणणेे आहे.