Thu, Jun 20, 2019 14:38होमपेज › Sangli › सांगली : कामटेच्या मामेसासर्‍यास १४ दिवसांची पोलिस कोठडी 

सांगली : कामटेच्या मामेसासर्‍यास १४ दिवसांची पोलिस कोठडी 

Published On: Dec 12 2017 3:34PM | Last Updated: Dec 12 2017 3:34PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेतचा कोठडीत मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर कावळेसाद (आंबोली) येथे त्याचा मृतदेह जाळण्यात आला. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांचा यात सहभाग होता. दरम्यान, पोलिस ठाण्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कामटेच्या मामेसासर्‍याने मदत केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने त्यांना सीआयडीने काल (सोमवार) अटक केली होती. त्यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (वय 48, रा. सत्यविजय अपार्टमेंट, सांगली) असे त्यांचे नाव आहे. 

कामटेने अनिकेतचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिस गाडीतून बाहेर नेला. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अनेकांना संपर्क साधला. त्यादिवशीच्या कामटेच्या कॉल डिटेल्सवरून अनेकांकडे सीआयडीने चौकशीही केली आहे. 

याप्रकरणी यापूर्वीच कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली आहे. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.