Tue, Jun 25, 2019 13:11होमपेज › Sangli › माजी सभापती सुशांत देवकर यांचा शिवसेनेला रामराम

माजी सभापती सुशांत देवकर यांचा शिवसेनेला रामराम

Published On: Jul 10 2018 4:24PM | Last Updated: Jul 10 2018 4:24PMविटा : प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि सांगोले गावचे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी आणि विटा पंचायत समिती सदस्या कविता देवकर या मात्र पदावर राहतील. तसेच आपण पक्षाच्या कोणाही वरिष्ठ नेत्यांवर नाराज नसल्याचे आणि माझ्या कामाची पद्धत शिवसेनेत जुळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्‍यांनी आवर्जून सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना सुशांत देवकर म्हणाले, गेली तीन - चार वर्षे शिवसेना पक्षाबरोबर काम केले. परंतु माझ्या कामाच्या पद्धतीनुसार मला काम करणे शिवसेनेत जुळत नसल्याने हा निर्णय घेतला आहे. यापुढील दिशा लोकांमध्ये जाऊन माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. सर्व कार्यकर्ते आणि सहकार्यांची मते आजमावून घेऊन भविष्यातील योग्य निर्णय घेऊन पुढील वाटचाल करणार आहे