Sun, May 26, 2019 01:34होमपेज › Sangli › सांगलीत रमजान ईदनिमित्त नमाज पठण

सांगलीत रमजान ईदनिमित्त नमाज पठण

Published On: Jun 16 2018 10:47PM | Last Updated: Jun 16 2018 10:26PMसांगली : प्रतिनिधी

रमजान ईदनिमित्त येथील जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. यावेळी राजकीय, सामाजिक, पदाधिकारी, अधिकार्‍यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. 

शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाल्याने जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद साजरी करण्यात आली. सकाळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. यावेळी ईदगाह कमिटीचे अध्यक्ष महापौर हारुण शिकलगार व सेक्रेटरी मुन्ना कुरणे यांनी शुभेच्छा दिल्या.  आफीज इरफान यांनी नमाज पठण केले. हाफिज इस्माईल यांनी संदेश वाचन केले. हाफिज सद्दाम, हाफिज मन्सूर, हाफिज रऊफ, हाफिज गौस यांनी संयोजन केले. 

दरम्यान, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक रविंद्र शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, ‘जनसुराज्य’ चे समित कदम, शिवसेनेचे दिगंबर जाधव, दिग्विजय सूर्यवंशी, सागर घोडके, आयुब पठाण, फिरोज पठाण,  संतोष पाटील, किरणराज कांबळे, उत्तम साखळकर, आसिफ बावा, कय्युम पटवेगार, माजी महापौर कांचन कांबळे, सुयोग सुतार, करीम मेस्त्री, आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.