Sat, Aug 24, 2019 12:20होमपेज › Sangli › सांगलीत ७ जणांकडून युवतीवर बलात्कार  

सांगलीत ७ जणांकडून युवतीवर बलात्कार  

Published On: Feb 22 2018 8:13PM | Last Updated: Feb 22 2018 8:15PMसांगली : प्रतिनिधी

येथील एका 26 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी निलंबित पोलिस आकाश प्रकाश दबडे, महापालिकेचे निलंबित स्वच्छता निरिक्षक श्रीकांत वासुदेव वलसे-मद्रासी (वय 41, रा. हरिपूर रस्ता) यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. संतोष मुळे, सरोजा हेगडे, अझरुद्दीन उस्मान टीनमेकर शेख (वय 29, रा. गणेशनगर), बाळू रनबिरे, सदाशिव निलवनी, अनिल कांबळे हे इतर संशयित आहेत. संबंधित युवतीने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी शेख आणि मद्रासी यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवार (दि. 26) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर सहा जणांचा पोलिस शोध घेत असून ते फरार आहेत. 

पोलिसांनी सांगितले की, संबंधित युवतीवर 2006 साला पासून यातील सात आरोपींनी वेळो-वेळी आणि वेग-वेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. यामधील सरोजा हेगडे यांनी हा गुन्हा करण्यास मदत केल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

धामणी रस्ता, आकाशनगर, शंभरफुटी रस्ता, शामरावनगर या परिसरात लग्नाचे अमिष दाखवून, भाड्याने खोली देतो, असे सांगून, जबरदस्तीने हा प्रकार झाल्याचे संबंधित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्या शिवाय निलंबित पोलिस दबडे याने पोलिसात तक्रार देण्यासाठी मदत करतो, असे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. 

युवतीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शेख आणि मद्रासी यांना ताब्यात घेऊन अटक केली. सकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, दोघांना अटक केली असून इतर सहाजणांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर सुद्धा लवकरच कारवाई करण्यात येईल.