Sat, Jul 20, 2019 11:28होमपेज › Sangli › चौरंगीनाथ क्षेत्र विकासाकडे दुर्लक्ष

चौरंगीनाथ क्षेत्र विकासाकडे दुर्लक्ष

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 8:27PMदेवराष्ट्रे : विठ्ठल भोसले

कडेगाव तालुक्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या आणि प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यात असणार्‍या चौरंगीनाथ वन पर्यटन क्षेत्राकडे दुर्लक्ष  झाले आहे. तर सार्‍या परिसरात प्लॅस्टिकचा खच पडला आहे.  विश्रामगृहाच्या नूतन इमारतीसमोर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या आहेत. स्वच्छतागृहातील फरशा, दरवाजे मोडून पडले असून जमीन देखील खचली आहे. आतमध्ये प्लॅस्टिकचा ढीग साचला आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी बांधलेल्या युवा गृहातील गाद्या फाटल्या आहेत. बालोद्यानातील खेळणी मोडून पडली आहेत. 

सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेल्या कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथील ग्रामदैवत चौरंगीनाथाचे मंदिर व परिसरात  तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी कोट्यवधीची विकास कामे केली आहेत. कदम यांनी पर्यटन क्षेत्राचा विकास करताना येथील रस्ते, विश्रामगृह, बालोद्यान, युवा गृह, माहिती केंद्र यासह पिकनिक पॉईंट विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.
बालोद्यानाच्या परिसरात हजारो नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

देशिक वनविभागाकडे असलेल्या चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन क्षेत्रात कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. निसर्गाचे लाभलेले वैभव आणि झालेली विकासकामे यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्याही वाढत गेली. आता मात्र या निसर्ग पर्यटन क्षेत्राला दृष्ट लागावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारती पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. विश्रामगृहातील काही खोल्यांचे अजूनही काम अपुरे आहे. स्वच्छतागृहातील फरशा, दरवाजे मोडून पडले असून जमीन देखील खचली आहे.