Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Sangli › चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

Published On: Jan 01 2018 2:08AM | Last Updated: Dec 31 2017 10:16PM

बुकमार्क करा
कुपवाड : वार्ताहर

कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रक रविवारी एमआयडीसी पोलिसाकडून पकडण्यात आला. ही वाळू टेभूर्णी( ता. माढा, जि.सोलापूर) येथून आणण्यात आली होती.  ट्रक व पाच ब्रास वाळू असा साडेतेरा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चालक व मालक अंकुश सुभाष डोके(वय35, रा. टेभूर्णी,ता.माढा,जि.सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रकमालक अंकुश डोकेहा टेंभूर्णी  येथून बेकायदेशीर आणलेली वाळू विक्रीसाठी कुपवाडला आणत होता.  या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी हा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये पाच ब्रास वाळू भरली होती व त्यावर लाकडी भुसा भरलेली पोती ठेवून लाकडी फळ्या लावून पोलिसांची व महसूल अधिका-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.