होमपेज › Sangli › राज्यातील २८८ आमदार बिनकामाचे : संभाजी भिडे

राज्यातील २८८ आमदार बिनकामाचे : संभाजी भिडे

Published On: Jan 09 2018 8:04PM | Last Updated: Jan 09 2018 8:00PM

बुकमार्क करा
तासगाव : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारण्यांनी केवळ राजकारणासाठी वापर केला आहे. राज्यातील २८८ मराठा आमदार बिनकामाचे असून, प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे स्‍मारक व्‍हावे यासाठी कोणताही आमदार प्रयत्‍न करत नाही, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. तासगाव (जि. सांगली) येथे त्‍यांची सभा झाली यावेळी ते बोलत होते. 

भिडे यांनी खासदार संजय पाटील यांना उद्देशून भाष्य केले. त्यांनी कधी प्रतापगडावर. शिवस्‍मारक व्‍हावे म्‍हणून कधी उपोषण केले आहे का? असा सवाल भिडे यांनी उपस्‍थित केला. सभेला मोठा पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला होतो. 

भिडे म्हणाले, 'भारत सध्या दहशतववादाच्या विळख्यात आहे. राज्यकर्ते फक्‍त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत असतात, मात्र शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श कोणीच पाळत नाही. राज्यात हजारोंच्या संख्येने पुतळे उभा करण्यात आले आहेत. मात्र, ते राज्यकर्त्यांचे नाटक आहे.' शिवाजी महाराजाबद्दलचे प्रेम, श्रध्दा फक्‍त आता जिभेवर राहिली आहे, अशी खंत त्यांनी व्‍यक्‍त केली.