Wed, Jul 17, 2019 20:26होमपेज › Sangli › भिडे यांच्या अटकेसाठी  मोर्चास हजारो कार्यकर्ते रवाना

भिडे यांच्या अटकेसाठी  मोर्चास हजारो कार्यकर्ते रवाना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

भीमा -कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी व सूत्रधार भिडे यांना त्वरित अटक करावी, महाराष्ट्र बंद मधील आंदोलकांवरील सर्व खटले रद्द करावे,   विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क वेळेवर दिल्या जाव्यात, आदी मागण्यासाठी  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर आज  (दि. 26) एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आज रवाना झाले.

या आंदोलनासाठी  सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, प्रभारी जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, योगेश भाले, उपाध्यक्ष स्वप्नील खांडेकर, सोमनाथ कांबळे, किसन जगताप, प्रियांका धुळे, गौतम भगत, आकाश कांबळे,  हिरामण  भगत, अमोल भंडारे,  दीपाली बळखंडे, अनिकेत सावंत आदी गेले आठ दिवसांपासून तयारी करीत आहेत.  त्यासाठी  त्यांनी गावोगावी बैठका घेतल्या आहेत. त्याला लोकांच्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. आज (सोमवारी) दुपारी 12 वाजता मुंबईतील  जिजामाता उद्यान भायखळा (पूर्व) येथे सर्वांनी उपस्थित रहावे. त्यानंतर तेथून  विधान भवनवर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.  

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येने या मोर्चास उपस्थित रहावे, असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम यांनी केले आहे.


  •