Fri, Feb 22, 2019 16:35होमपेज › Sangli › नदीचे पात्र विस्तारू लागले

नदीचे पात्र विस्तारू लागले

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 8:14PMसांगली : प्रतिनिधी

संततधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी 28 फुटांपर्यंत गेली आहे. वसंतदादा स्मृतीस्थळावर  नागरिकांची गर्दी वाढत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे महापुराच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.कोयना आणि चांदोली धरणात पाणीसाठा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात वाढ होत आहे. आठ दिवसांपासून सांगली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. आठ दिवसामध्ये 17 फुटांवरून पाण्याची पातळी 28 फुटांपर्यंत आली आहे. 

सांगलीत पाण्याची पातळी 28 फुटांपर्यंत गेल्यामुळे पुन्हा एकदा पुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.  कृष्णानदीमध्ये मगरींचा वावर असल्याचा धोका ओळखून आता कपडे धुणार्‍यांची संख्याही कमी होत आहे. महापालिकेने मगरीपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी सुध्दा मुले पाण्यात उतरत आहेत. कोयना धरणात पाण्याची पातळी 2 हजार 144 फूट इतकी आहे. एकूण पाणीसाठा 58.08 टीएमसी इतका आहे. कोयना : 93 मिमी., नवजा - 129 मिमी., महाबळेश्‍वर -71 मिमी. इतक पाऊस पडला आहे. एकूण पाण्याची आवक 27759 क्युसेक  तर 17454 क्युसेक विसर्ग आहे.