Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Sangli › तोडफोड करून आरक्षण मिळणार का ?

तोडफोड करून आरक्षण मिळणार का ?

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:09AMसांगली :  

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित असून  सरकारकडून त्याबाबत  पाठपुरावा सुरू आहे. आंदोलनाच्या माध्यमातून तोडफोडीचा सुरू असलेला प्रकार चुकीचा आहे.  तोडफोड करुन आरक्षण मिळणार आहे का, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना येथे केला.दरम्यान आंदोलनात  काही समाजकंटक   घुसले असल्याचा आरोपही ना. पाटील यांनी  केला. मराठा समाजातील संघटनांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहनही त्यांनी केेले. 

ना. पाटील म्हणाले, आरक्षण हे आता न्यायालयाच्या अखत्यारीत आहे.  मागासवर्गीय आयोगाचे काम काही प्रमाणात प्रलंबित आहे. त्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार   आहे. तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होणार आहे.  काही पेड लोक या आंदोलनात घुसले आहेत, त्यांना आंदोलन बदनाम करायचे आहे. शिवाय महाराष्ट्र अस्थिर करायचा असल्याचे दिसून येत आहे. 

ते म्हणाले, गेली चार वर्षे राज्याचा कारभार  उत्तम चालला आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली. निवडणूक वर्षात आंदोलनाचे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे खरे आंदोलक जे आहेत त्यांनी या पेड लोकांना, समाजकंटकांना खड्यासारखे बाजूला करायला हवे. आम्ही सरकार म्हणून या आंदोलनकत्यार्ंसोबत चर्चेला तयात आहोत.  काकासाहेब शिंदे यांंची घटना दुःखद आहे. पण या मार्गाने काही प्रश्‍न सुटणार नाहीत. सरकारच्या हातात जेवढे आहे तेवढे आम्ही केले आहे. आता आरक्षणाची गोष्ट न्यायालयीन बाब आहे. त्यामुळे जे आपल्या हातात नाही. त्यासाठी आंदोलन करुन काही उपयोग होणार नाही.

मराठा क्रांती संघटनेच्यावतीने राज्याच्या विविध भागात आंदोलन करण्यात येत आहेत. काही मंत्र्यांना आंदोलनकर्त्यांनी घेरावही घातला होता. यामुळे या परिस्थितीचा आढावा घेऊन वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजेसाठी गेले नाहीत. पंढरपूरहून वारकरी आपल्या घरी परतणार आहेत; परंतु आंदोलनाची तीव्रता वाढल्याने  पंढरपूरमध्ये सात लाख वारकरी अडकूनआहेत, याला कोण जबाबदार आहेत, असा सवालही  ना. पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.