Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Sangli › ‘मृत महिलेवरच खुनाचा गुन्हा दाखल’ 

‘मृत महिलेवरच खुनाचा गुन्हा दाखल’ 

Published On: Dec 18 2017 1:59PM | Last Updated: Dec 18 2017 1:37PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

लिंगनूर (ता. मिरज) येथे असलेल्या बसरकुडी भागातील विवाहिता लक्ष्मीबाई मारुती नाईक (वय 30) हिने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

चार वर्षांचा सोहम आणि पाच महिन्यांचा लक्ष्मण यांचे मृतदेह मंगळवारी दुपारी विहिरीवर तरंगताना दिसल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला, पण कारण अस्पष्ट राहिले. पोलिसांनी त्या महिलेवरच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीबाईने मुलांसमवेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त  करण्यात येत होता. लक्ष्मीबाई ह्या घरकाम आणि शेतमजुरीकरीत होत्या. त्यांचे पती मारुती हे ऊसतोड करण्यास गेले होते.

हा प्रकार समजल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. याचा पोलिसांनी आज तपास  केला, पण आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र आज पोलिसांनी मृत महिलेवरच खुनाचा गुन्हा दाखल केला. तिने पाण्यात त्या दोन मुलांना  टाकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.